मांडेदुर्गला स्मार्ट गाव बनवू : गोपाळराव पाटील

0
269

चंदगड  (प्रतिनिधी) :  मांडेदुर्ग गावाच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी आणून स्मार्ट गाव करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी केले. मांडेदुर्ग (ता. चंदगड)  येथे त्यांच्या हस्ते १६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण आणि विद्याताई पाटील यांच्या निधीतून मांडेदुर्ग गावातील अंतर्गत रस्ते आणि तालीमचे बांधकाम  करण्यात येणार आहे. जि.प. सदस्य भोगण यांच्याकडून ५ लाख रूपये निधी, तर विद्याताई पाटील यांच्याकडून ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला  आहे. यावेळी नूतन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल विनायक कांबळे आणि अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कल्लाप्पा भोगण, विद्याताई पाटील,  संभाजीराव देसाई शिरोलीकर, विलास पाटील, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर,  संदीप नांदवडेकर,  नितीन फाटक, प्रेरणा पाटील,  आश्विनी पाटील, अनुसया पाटील,  शिवाजी पाटील,  मारुती ढोकरे, मारुती पाटील, मारुती तळगुळकर,  राजाराम गुंडप, जयवंत शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.