कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा ते विशाळगड हा दैदिप्यमान इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी दिशादर्शक फलक लावणे, विशाळगड येथील मंदिरांचा जिर्णोद्धार, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचे सुशोभिकरण याविषयी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देऊ. विशाळगड प्रश्नासंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्र्यांसमवेत बैठकीचे नियोजन करू, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिले.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या सदस्यांनी खा. माने यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, बाबासाहेब भोपळे, हिंदू जनजागृती समितीचे कोकण, तथा गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये, शिवानंद स्वामी, विपुल भोपळे, राजश्री तिवारी आदी उपस्थित होते.