मुंबई (प्रतिनिधी) : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (मंगळवार) आठवा स्मृतीदिन आहे. शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहली आहे. 

अजित पवार म्हणाले की,  महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर नेहमी अधिराज्य केले आहे. महाराष्ट्राची अस्मिता तसेच मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. राज्याची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असेही पवार यांनी सांगितले.