गांधीनगरमधील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करू : आ. ऋतुराज पाटील

0
371

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील विविध रस्त्यांसह दहा लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करू. असे आश्वासन आ. ऋतुराज पाटील यांनी माजी ग्रा.पं. सदस्य धीरजकुमार तेहल्यानी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले.

महादेव मंदिर ते साईबाबा मंदिर रस्ता, पोलीस चौकी ते ईगल ग्रुप-कोयना कॉलनी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या दोन्ही रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात यावे आणि दहा लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करावी. अशी मागणी धीरजकुमार तेहल्यानी, सनी चंदवानी, ग्रा.पं. सदस्य विनोद हुजूराणी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आ. ऋतुराज पाटील यांच्याकडे केली. त्यावर सहमती दर्शवत आ. पाटील यांनी ही कामे ताबडतोब केली जातील, असे आश्वासन गांधीनगर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले.