कागल तालुक्यातील सरंजामशाही मोडून काढूया : प्रविणसिंह पाटील

0
34

मुरगूड (प्रतिनिधी) : कागल तालुक्यात सरंजामशाही पुन्हा डोकेवर काढत आहे. त्यांच्या मुजरेगिरी आणि हुजरेगिरीसह सरंजामशाही मोडून काढूया, असे प्रतिपादन मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केले. ते मुरगुडमध्ये कै. सुलोचनादेवी विश्वनाथराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित बांधकाम कामगारांना सुरक्षासंच वाटप आणि धनादेश वाटपावेळी बोलत होते.

प्रवीणसिंह पाटील म्हणाले की, ते कोणतेही जनसामान्यांचे काम न करता विरोधक आमदार हसन मुश्रीफ यांना पराभूत करण्याची वल्गना करीत आहेत. आ. मुश्रीफांबद्दल कोणताही अपशब्द यापुढे खपवून घेतला जाणार नाही. मुश्रीफ यांना पराभूत करणारा अद्याप तरी जन्माला आलेला नसून आम्ही पहाडासारखी त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन केले.

आ. मुश्रीफ म्हणाले, निराधारांची पेन्शन योजना असो की गोरगरिबांच्या वैद्यकीय सेवेची योजना असो की बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या योजना असोत त्या गोरगरिबांच्या तळमळीतूनच मी सुरू केल्या. त्यामुळे त्यावर शिक्का माझाच आहे, तो कधीच पुसला जाणार नसल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी श्रीमती विमल सातापा डेळेकर यांना दोन लाख, सागर मधुकर वाघरे यांना अपंगत्वाबद्दल दोन लाख, अश्विनी एकनाथ हासबे यांना विवाहासाठी ५१ हजार, शुभांगी सुखदेव चौगुले यांना शिक्षणासाठी ६० हजार अशा धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवाजी पाटील, शामराव घाटगे, रणजित सूर्यवंशी, सत्यजितसिंह पाटील, प्रकाश रामाणे, राजू आमते, कुंडलिक भांडवले, राहुल आमते, साताप्पा पाटील, गणपती बारड, बाजीराव दबडे, बाळासाहेब आंगज आदी उपस्थित होते.