कोरोनाचे संकट दूर होऊ दे..! : कुरुंदवाडमध्ये शिवसेनेच्या वतीने अभिषेक, होमहवन   

0
26

शिरोळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम तसेच समृद्ध व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने कुरुंदवाडमध्ये आज (गुरूवार) महाभिषेक व होमहवन करण्यात आले.

कुरुंदवाड शहर शिवसेनेच्या वतीने आज महाशिवरात्री निमित्त कृष्णा-पंचगंगा घाट या ठिकाणी हा महाभिषेक व होमहवन पूजा करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख  मुरलीधर जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत ही विधी पार पडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे, आण्णासाहेब बिलोरे, शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, अर्जुन जाधव, युवासेना तालुका समन्वयक निलेश तवंदकर, महिला शहर प्रमुख वैशाली जुगले, संतोष नरके, राजू बेले, युवराज पाटील, स्वप्नील चव्हाण, अनिकेत बेले, संतोष गायकवाड आदीसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.