पवारसाहेबांना उदंड आयुष्य लाभू दे… : आजोळच्या ग्रामस्थांची प्रार्थना (व्हिडिओ)

0
212

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शरद पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना त्यांच्या मामाच्या गावातील म्हणजेच पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे ग्रामस्थांनी भैरवनाथाच्या चरणी केली आहे. ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस त्यांच्या फंडातून उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळेच्या परिसरात ग्रामस्थांनी केक कापून साजरा केला. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थनाही या वेळी गोलिवडे ग्रामस्थांनी ग्रामदैवत भैरवनाथाच्या चरणी केली.

 

 

दोनच वर्षांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या मामाच्या गोलिवडे गावी भेट दिली होती. या वेळी त्यांनी त्यांच्या फंडातून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी दिला होता. सध्या या शाळेच्या बांधकाम सुरू आहे. शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आज संपूर्ण राज्यात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर मामाच्या गावच्या लोकांनाही त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या वेळी श्री योगी प्रभुनाथ महाराज फौंडेशनचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.