समाज प्रबोधन करणे गुन्हा असेल तर होऊ दे दाखल : ललित गांधी

0
96

कोल्हापूर (प्रतिनिधी) :   व्यापाऱ्यांच्या हक्कासाठीच्या लढ्यानंतर १९ जुलैपासून आपल्याला व्यापार सुरू करण्याची परवानगी मिळाली. या परवानगी बरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या’ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रबोधन फेरीचे आयोजन केले. यावेळी पोलीसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला. समाज प्रबोधन हा गुन्हा ठरणार असेल होऊ दे गुन्हा दाखल. असे मत राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केले आहे.

गांधी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली. लोकांच्यामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. या प्रबोधनाच्या फेरी विरोधातही काही जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. न्याय हक्कासाठी लढा देणे, समाजाचे प्रबोधन करणारे उपक्रम राबवणे यासाठी कोणी तक्रारी दाखल करत आहेत.

समाज प्रबोधन हा गुन्हा ठरणार असेल, आणि आमच्यावर गुन्हे दाखल होणार असतील तरी आमची हरकत नाही. समाजाच्या प्रबोधनाचे काम आम्ही थांबवणार नाही. गुन्हे दाखल झाले म्हणून आमचा उत्साह कमी होणार नाही. असे ललित गांधी यांनी स्पष्ट केले आहे.