दत्तवाड परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर…

0
139

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावामध्ये गेले तीन ते चार दिवस बिबट्यासदृश प्राणी पाहायला मिळत आहे. नक्की हा बिबट्या आहे की रानमांजर याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, या प्राण्याच्या दिसण्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती वन्य विभागाला देण्यात आली आहे.

वन्य विभागाच्या पथक आणि हेल्पिंग हँड रेस्क्यू फोर्सने परिसराची पाहणी केली असता त्यांना प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. परंतु, हा बिबट्या आहे की रानमांजर याचा खुलासा अद्याप झालेला नाही. यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून आता याच्या आधारावर याची माहिती घेतली जाणार आहे. जाईल.

यावेळी वन्यखात्याचे डॉ. वाळवेकर, हेल्पिंग हँड रेस्क्यू फोर्सचे निलेश तवंदकर, श्रेयस धुमाळे, निलेश वनकोरे, सत्यजित सूर्यवंशी, मुकेश माळगे, संतोष गायकवाड, सागर सूर्यवंशी,आनंद कोष्टी, विश्वनाथ रजपूत, अमर पाटील, श्रेयस माळी, शलमोन आवळे, अजय आडसुळे उपस्थित होते.