कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने १९ ऑगस्ट १९६५ च्या महागाई विरोधी ‘चूलबंद, कचेरी बंद’ आंदोलनातील ६ हुतात्म्यांना आज (गुरूवार) अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आंदोलनाची पार्श्वभूमी विषद केली. त्याचबरोबर केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

कोल्हापुरात १९ ऑगस्ट १९६५ रोजी महागाई प्रतिकार कृती समितीच्या वतीने महागाई विरोधात ‘चूलबंद, कचेरी बंद ‘जन आंदोलन केले होते. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ६ आंदोलकांनी बलिदान दिले होते. तर या आंदोलनामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेची सुरुवात होऊन शेतकऱ्यांच्या कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. या आंदोलनाचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आज बिंदू चौकात डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँ. चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, शंकर कांबळे, बाबूराव कदम, नामदेव गावडे, रेश्मा चांदणे, अनिल चव्हाण, बी. एल. बर्गे, सुमन पाटील, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, एस. बी. पाटील, शाहीर सदाशिव निकम, प्रशांत आंबी, सुनिता अमृतसागर, इर्शाद फरास, शंकर काटाळे, आरती रेडेकर, हरीश कांबळे, कृष्णा पानसे, बाबा ढेरे, अनिल चव्हाण, संजय सदलगेकर, बळवंत पवार, एन. सी. पाटील आदी उपस्थित होते.