गगनबावडा तालुक्यात सरपंच पदाची सोडत…

0
96

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात आज (बुधवार) सकाळी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. तहसिलदार संगमेश कोडे यांच्या उपस्थितीत नायब तहसिलदार संजय वाळवी, रोहिणी शंकरदास, मंडलाधिकारी विवेक लुगडे आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले.

आठ ठिकाणी याप्रमाणे निवडी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तर उर्वरित २१ ग्रामपंचायतीत आपलाच संरपंच होण्यासाठी वेगवान हालचाली सुरु होणार आहेत. तालुक्यातील नुकत्याच निवणुका झालेल्या ८ ग्रामपंचायतीसह उर्वरित २१ अशा एकुन २९ ग्रामपंचायतीच्या २०२० ते २०२५ करीता सरपच पदाचे आरक्षण  काढण्यात आले. या आरक्षणाद्वारे गावगाडा चालविण्याची सुत्रे तालुक्यातील १४ ठिकाणी महिलांच्याकडे येणार आहे.

२९ ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढील प्रमाणे :

अनुसुचित जाती : साखरी-म्हाळुंगे, शेळोशी , मणदूर.

अनुसूचिन जाती महिला : गगनबावडा, खोकुर्ले.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : तिसंगी, साळवण, सांगशी-सैतवडे, वेतवडे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : असळज, असंडोली, किरवे, कडवे.

सर्वसाधारण : मांडुकली, धुंदवडे, तळये बुद्रूक, लोंघे, वेसर्डे, बावेली, मार्गेवाडी, बोरबेट.

सर्वसाधारण महिला : कातळी, खेरीवडे, कोदे बुद्रूक, निवडे, जर्गी, मुटकेश्वर-खडुळे, अणदूर, शेणवडे, असे आहेत.