जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर : जिल्हाधिकारी

0
853

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायती मध्ये २०२०-२५ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्री सरपंच पदासाठी मंगळवार, १५ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार होती. परंतु, आता ही सोडत ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.