कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी १० हजार लाचेची मागणी केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय ३५, नेमणूक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, रा. मु. पो. शिंगणापूर, ता. करवीर) असे या कॉन्स्टेबलचे नांव आहे.

गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांच्यासाठी तक्रारीपूर्वी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे मान्य करून आणखीन १० हजार लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.