लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

0
54

मुंबई (प्रतिनिधी) : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं,  अशा भावना  पुणेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल. मात्र आज दरेकरांसारखे विरोधी पक्षनेते असे विधान करतात, हे चुकीचे आहे. भाजप सारख्या पक्षात प्रवीण दरेकर सारखे नेत्यांचा काही उपयोग नाही,  असेही सुरेखा पुणेकर म्हणाल्या.