गांधीनगरमध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ…

0
189

करवीर (प्रतिनिधी) : गांधीनगर येथे ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित आयोगाच्या फंडातून विविध अंतर्गत गटर आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ सरपंच रितू लालवानी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच सोनी सेवलानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गांधीनगरमध्ये गटर आणि काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. गांधीनगर ग्रामपंचायतीमधे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून विविध अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य सभापती कल्पना टोमके ग्रामपंचायत सदस्य विनोद हुजूरानी, कमल कल्याणकर ग्राम विकास अधिकारी चंदन चव्हाण, कॉन्ट्रॅक्टर सचिन जोशी परिसरातील नागरिक उपस्थित होते.