नवी दिल्ली (प्रतिनिधी) : नव्या जमान्याचा डिजिटल पत्रकारिता आदर्श, मूल्य, कायदा आणि गतिमानता या तत्त्वांवर उभी रहावी यासाठी महाराष्ट्रातून सुरु झालेली डिजिटल पत्रकारिता संघटन चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्राने नेतृत्व करावे. असा सूर पत्रकारांतून उमटला. अँड. अमोल पाटील यांच्या “दि इंडिपेंडंट व्हाइस” या आंतरराष्ट्रीय विषयांना वाहिलेल्या इंग्रजी न्यूज पोर्टलचा शुभारंभ प्रेस क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार व डिजिटल मीडिया एडिटर अँड जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने कुमार पंकज, नवी दिल्ली तसेच दि इंडिपेंडेंटचे मुख्य संपादक अॅड. अमोल आर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
www.the independentvoice.in या न्यूज वेब पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मुख्य संपादक अमोल पाटील यांनी पत्रकारिता आणि डिजिटल बातम्यांना युगाच्या गतिमान अत्याधुनिक तंत्राला पत्रकारिता मूल्यांची जोड देण्याचा निर्धार व्यक्त केला. दि इंडिपेन्डस व्हाईस वाचकांच्या विविध आवडी आणि माहितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आमचे अनुभवी पत्रकार आणि तंत्रज्ञान-जाणकार सामग्री निर्मात्यांची टीम जगभरातून अचूक, संबंधित आणि अद्ययावत बातम्या देण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले. तर कुमार पंकज यांनी, वेब न्यूज पोर्टलच्या विषयाची गुणवत्ता आणि विशिष्टतेचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले.
तसेच राजा माने यांनी, कोविड नंतरच्या पत्रकारितेच्या युगात डिजिटल बातम्यांचे महत्त्व पटवून दिले. दि इंडिपेन्डस व्हाईस या अधिकृत लॉन्चद्वारे त्यांनी त्यांच्या डिजिटल मीडिया पोर्टल असोसिएशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस व्यक्त केला. तसेच प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अधिकारी, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे पत्रकार आणि त्यांच्या अतुलनीय समर्थनासाठी आणि उत्साही भागीदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो. विकसित होत असलेल्या बातम्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आम्ही दि इंडिपेन्डस व्हाईस सतत प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.