आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते आज (रविवार) छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख नगरसेवक संभाजी पाटील होते.

यावेळी विजय देवणे यांनी, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवून आजरा तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी उच्चांकी करुन शिवसेना घराघरात पोहचावी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून आठवडाभर माझे गाव- कोरोनामुक्त गाव हे अभियान राबवावे, असे सांगितले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी आणि कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संभाजी पाटील, दीनानाथ चौगुले, राजेंद्र सावंत, युवराज पोवार,  ओंकार माद्याळकर, प्रतीक क्षीरसागर, दिनेश कुंभीकर, महेश पाटील, शिवसैनिक उपस्थित होते.