कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली 20 वर्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या सार्थक क्रिएशन्सचा नव्या प्रशस्त वास्तूतील शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील दिग्गज  अभिनेते भरत जाधव होते.

विश्वविक्रमी नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे संचलित सार्थक क्रिएशन्स च्या नृत्य, नाट्य, अभिनय,  संगीत, चित्र, शिल्प,  मॉडेलिंग, फिटनेस या सर्व कलांचे एकत्रित शिक्षण एकाच छताखाली मिळण्याची संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या या ठिकाणी सर्व सर्टीफाईड कमर्शियल कोर्सेस सोबत समाजातील वंचित घटकांसाठी मोफत प्रशिक्षण सुविधा देखील उपलब्ध केली आहे.

या शुभारंभ सोहळ्यास दिग्दर्शक चंद्रकांत जोशी,  सनमती मिरजे, माजी खासदार धनंजय महाडिक, मिलिंद धोंड, कुलदीप शिंगटे,  प्रकाश मेहता,  इंद्रजित चव्हाण, प्राचार्य एस. एस. चव्हाण, प्रमोद पाटील, डॉ. प्रवीण कोडोलीकर आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सागर बगाडे  यांनी तर  सूत्रसंचालन निशांत गोंधळी यांनी केले. निशांत कावणेकर यांनी  आभार मानले.