आजरा येथे राम मंदिर निधी समर्पण अभियानास प्रारंभ  

0
199

आजरा (प्रतिनिधी) : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण हेतू निधी संकलन अभियान अखिल भारतीय स्तरावर राबवण्यात येत आहे. ३१ जानेवारीदरम्यान हे अभियान होणार आहे. आजरा येथे आज (गुरुवार) रोजी प.पू किसन महाराज यांचेहस्ते कार्यालयाचे उद्घाटन व अभियान प्रारंभ करण्यात आले.

आजरा तालुक्यातील सर्व गावांत अभियान होणार असून या अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे शनिवार दि. १६ रोजी आजरा शहरामध्ये रामरथ यात्रा काढण्यात येणार असून दुपारी अडीचच्या सुमारास व्यंकटराव हायस्कूल येथून या यात्रेस सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.