वाडी रत्नागिरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ…

0
96

बोरपाडळे (प्रतिनिधी) : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत वाडी रत्नागिरी येथे आज (रविवार) राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी ०-५वयोगटातील १७,९८७ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारूख देसाई, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अनिल कवठेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिनोलकर व सर्व स्टाफ उपस्थित होते.पन्हाळा तालुक्यात एकूण ०-५वयोगटातील १७९८७ बालकांना पोलिओ डोस तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल कवठेकर, प्रा. आ. केंद्र बाजार भोगाव, कळे, पडळ, कोतोली,बोरपाडळे,केखले आणि पोर्ले येथे देण्यात आले. यासाठी तालुक्यात एकूण १६० बूथ तसेच १८ ट्रांझीट टीम, ३२ मोबाईल टीम कार्यरत होते. विशेषत: ऊसतोड,विटभट्टी , बांधकामे,रस्ते व गु-हाळ इ.जोखिमग्रसत भागांना भेटी देऊन एकही लाभार्थी पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली. तसेच कोरोना प्रतिबंधक दक्षता सर्व बूथवर घेण्यात आली होती.

येत्या चार दिवसात आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन उर्वरित लाभार्थी आणि नवीन जन्मलेल्या बालकांना पोलिओ डोस देणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करून मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले.