तळसंदे येथे घंटागाडीचा शुभारंभ…

0
74

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने  घेण्यात आलेल्या घंटागाडीचा शुभारंभ सरपंच अमरसिंह पाटील, माजी उपसरपंच मनोहर चव्हाण, ग्रा.पं. सदस्य  विशाल चव्हाण, प्रकाश कोळी यांच्या हस्ते  करण्यात आला.

१५ व्या वित्त आयोगातून शासनाच्या निकषाप्रमाणे ई निविद्वारे घंटागाडी घेतली आहे. गावातील केर-कचरा एकत्रित करून गावाबाहेर एकत्र करण्यात येणार आहे. यामुळे गावातील आरोग्य आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन होणार आहे. तरी या उपक्रमाचा नागरिकांनी योग्य वापर करून  सहकार्य करावे, असे प्रतिपादन सरपंच अमरसिंह पाटील यांनी केले.

यावेळी माजी सरपंच बाबासाहेब पाटील, ग्रा.पं. सदस्य शिवाजी पाटील सुधा कांबळे, जयश्री संकपाळ, प्रल्हाद चव्हाण,  प्रशांत पाटील, शामराव  सुवासे, विश्वास मोहिते, सिताराम मोहिते, आप्पासाहेब संकपाळ आदी उपस्थित होते.