धामोड (प्रतिनिधी) : दिवंगत रामचंद्र बाळू कुंभार (गुरुजी) यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात तत्वाशी एकनिष्ठ राहून निस्वार्थीपणे समाजसेवा केली. त्यांचे शैक्षणिक कार्यदेखील उल्लेखनीय होते. त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव डॉ. पी.आर. कुंभार समर्थपणे पुढे चालवत आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे हिंदी विभाग, प्रमुख प्रा.डॉ. वसंतराव मोरे यांनी केले.  

राधानगरी तालुक्यातील कै. रामचंद्र बाळू कुंभार स्मृती प्रतिष्ठान आणि कै. तानाजी रामचंद्र कुंभार मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला ग्रंथ दिंडी आणि तुळशी धामणी परीसरातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना, विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास कणेरी मठ येथील योग शिक्षक दत्तात्रय पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी डी.सी.कुंभार, वाचनालयाचे सचिव वैभव कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर परिसरातील विविध पदावर कार्यरत असलेले पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

प्रास्ताविक आर.एच.पाटील यांनी केले. मनोगत डी.एस. पाटील यांनी व्यक्त केले. डी.एस.कुंभार यांनी आभार मानले.