मुंबई (प्रतिनिधी) :   कन्नड सिनेसृष्टीतला  दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार  यांना कर्नाटक राज्याचा सर्वोच्च मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई   यांनी पुनीत राजकुमार यांना ‘कर्नाटक रत्न पुरस्कार’  देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की,  पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सरकार त्याची घोषणा करीत आहे. अभिनेते पुनीत राजकुमार यांचं नाव अमर व्हावं, यासाठी अनेक सूचना आल्या आहेत. सरकारची इच्छादेखील तशीच आहे. पुनीत यांचे आई-वडील डॉ. राजकुमार आणि पर्वतम्मा राजकुमार यांच्याप्रमाणेच त्यांचे समाधीस्थळ विकसित केलं जाणार असल्याचेही ते म्हणाले.