रेल्वे स्थानकावर स्फोटकांचा मोठा साठा जप्त : महिलेला अटक

0
193

कोझिकोड  (वृत्तसंस्था) : केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकावर प्रवासी ट्रेनमध्ये  स्फोटकांचा साठा सापडला. यावेळी १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर  रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहेत. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे एका महिलेकडून हा साठा जप्त केला आहे. तिला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे  खळबळ उडाली आहे.

मूळची तामिळनाडूची असलेल्या या महिलेचे नांव रमानी असे आहे. रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता विहिर खोदण्यासाठी आपण ही स्फोटके घेतली असल्याचा दावा तिने केला आहे.  परंतु रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.