लॅपटॉप चोरट्यास अटक…

0
109

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी पार्क येथील घराजवळ पार्किंग केलेली कारची काच फोडून त्यातील लॅपटॉप चोरणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी आज (बुधवार) सायंकाळी अटक  केली. सचिन शिवाजी आगलावे (रा. विक्रमनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी पार्क येथील शरवील प्रशांत काळे यांनी त्यांचा ३० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप त्यांच्या कारमध्ये ठेवला होता. ही कार त्यांनी घराजवळ लावली होती. दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी काळे यांच्या कारमधील लॅपटॉप लंपास केला होता. याबाबतची फिर्याद काळे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल केली होती. त्यानुसार हा लॅपटॉप पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन आगलावे यांने चोरल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना मिळाली होती. पोलिस पथकाने या प्रकरणी शोध घेतला असता सचिन आगलावे याला अटक केली.