घरातून लाखो रुपये किंमतीचा ऐवज लंपास

0
86

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वृद्ध महिला घर कामामध्ये असताना भरदिवसा चोरट्यांनी महिलेच्या घरात प्रवेश करून दोन तोळ्याचे गंठण आणि अर्धा तोळ्याची अंगठी, असा सुमारे लाखोंचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सुशिला अण्णासो पल्लके (वय ६५, मूळ रा. कुरुंदवाड, ताशी रोड, सध्या रा. फुलेवाडी सहाव्या बस स्टॉप जवळ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुशिला पल्लके या काल (रविवारी) रात्री घरकाम करत होत्या. दरम्यान चोरट्यांनी त्या एकट्या असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या घरात घुसून कपाटातील दोन तोळ्याचे गंठण आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी असा सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. काही वेळानंतर पल्लके यांना आपले  दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच, यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.