राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी ललित गांधी

0
51

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’च्या नवनिर्वाचित कार्यकारीणी मंडळाच्या पहिल्या बैठकीत अध्यक्षपदी ललित गांधी यांची सन २०२०-२१ ते २०२२-२३ वर्षाकरीता फेरनिवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी माणिक पाटील चुयेकर आणि प्रशांत पोकळे, सचिवपदी रणजित पारेख, सहसचिवपदी सतीश माने, हर्षवर्धन भुर्के तर खजिनदारपदी अनिल पिंजाणी यांची निवड करण्यात आली.

बिझनेस प्रमोशन कमिटीमध्ये कार्यकारिणी सदस्यांपैकी विजय येवले, महेश जेवराणी, प्रताप पोवार, भरत रावल यांची निवड करण्यात आली, कार्यकारीणीतील अन्य सदस्य रमेश कारवेकर, दिपक पुरोहित, अमित लोंढे, प्रितेश दोशी, व्यंकटेश बडे, इंदरलाल चौधरी, विपुल पारेख, स्नेहल मगदुम आहेत. नवनिर्वाचित सचिव रणजित पारेख यांनी असोसिएशनच्या सभासदांच्या सक्रिय सहभागाबद्दल व नवनिर्वाचित कार्यकारीणीचे अभिनंदन करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here