हुपरी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लालासाहेब देसाई यांची निवड 

0
178

हुपरी (प्रतिनिधी : हुपरी (ता.हातकणंगले) येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लालासाहेब शंकरराव देसाई यांची तर उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब रावसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

लालासाहेब देसाई मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून युवक काँग्रेसचे पंधरा वर्षापासून शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयासाठी हुपरी परिसरात नेटके नियोजन केले होते. त्यामुळे माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या आदेशानुसार लालासाहेब देसाई यांना अध्यक्षपद देण्यात आले.

हुपरी शहरात दोन वर्षांनी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कऱणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

हातकणंगले काँग्रेस कमिटीत आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते व तालुका अध्यक्ष भगवान जाधव यांच्या उपस्थितीत अध्यक्ष देसाई व उपाध्यक्ष गायकवाड यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी हातकणंगले नगराध्यक्ष अरुण जानवेकर, माजी शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव, किरण पोतदार, तानाजी घोडेस्वार, अरुण पाटील, अनिल धोंगडे, भैरवनाथ पवार, रमेश पाटोळे, राजेश होगाडे, प्रतापसिंह जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.