बांधकाम कामगारांच्या मोर्चाला कामगारमंत्री हसन मुश्रीफ सामोरे…

0
91

कागल (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना दिपावली बोनस दहा हजार रुपये मिळावा आणि अन्य मागण्यांसाठी  कागलमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला कामगार मंत्री हसन मुश्रीफ भर रस्त्यातच सामोरे गेले. यावेळी कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन ना. मुश्रीफ यांच्याकडे दिले.

यावेळी ना. हसन मुश्रीफ म्हणाले,  आपण कामगार मंत्री असताना  बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या विविध योजना सुरू केल्या. बांधकाम कामगार बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा मोर्चा कागल बसस्थानकापासून गैबी चौकापर्यंत हा मोर्चा निघणार होता. बसस्थानका जवळच्या छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मोर्चा येतात. कागल येथील विश्रामगृहाततून शहरात चाललेले मंत्री मुश्रीफ मोर्चाला सामोरे जात त्यांचे निवेदन स्वीकारले.

यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, रजनीकांत माने, सद्दाम मुजावर, केम्पान्ना हालगेकर, सूर्यकांत लोंढे, गीता कांबळे, सचिव रामचंद्र निकम, जिल्हा सचिव राहुल दवडते,  सचिन बिरांजे आदी उपस्थित होते.