कुरुंदवाड पालिकेला अखेर रुग्णवाहिका मिळाली…

0
162

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडची लोकसंख्या चाळीस हजार असून पालिकेला कोरोना काळात रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिकेविना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबत पालिकेने पाठपुरावा केला होता. अखेर आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विकास निधीतून सतरा लाखांची रुग्णवाहिका पालिकेला मिळाली. आज (रविवार) आरोग्य राज्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते  याचा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून देशात राज्यात कोविड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. याचा भार स्थानिक स्वराज्य संस्थाच्यावर पडला होता. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवेचा पालिकेवर भार पडणार आहे. त्यासाठी पालिकेने चोवीस तास रुग्णांना सेवा द्यावी.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील, अक्षय आलासे, माजी नगरसेवक उदय डांगे,जवाहर पाटील, रमेश भुजुगडे, महावीर दिवटे, दिपक गायकवाड, प्रा.सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.