कोल्हापूर (प्रतिनिधी) :  इचलकरंजीमध्ये मंगळवारी वादग्रस्त शेत जमिनीचा निकाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आपल्या बाजूने लावून देतो. असे सांगत तक्रारदारांकडून ३ लाख रुपयांची लाच घेताना भिकाजी नामदेव कुराडे (रा. साईनगर चंदूर, ता. हातकणंगले) याला रंगेहात अटक केली होती. यामध्ये भिकाजी कुराडे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी आज (बुधवार) इचलकरंजी न्यायालयाने सुनावली आहे.

या प्रकरणात कुराडे यांचा मुलगा सारंग भिकाजी कुराडे आणि इम्रान मुसा शेख (रा. शंभरफुटी रोड, सांगली) यांची नावे निष्पन्न झाली होती.  या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेवून तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आज (बुधवार) त्यांना इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता मुख्य आरोपी भिकाजी कुराडे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी रिंमाड मंजूर केला आहे. तर अन्य सांरग कुराडे आणि इम्रान शेख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.