यड्रावच्या सरपंच पदी कुणालसिंह नाईक-निंबाळकर तर उपसरपंच पदी प्राची हिंगे…

0
97

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी आज (गुरुवार) पार पडल्या. तर यड्रावमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. यामध्ये सरपंच पदी कुणालसिंह नाईक-निंबाळकर, तर उपसरपंच पदी प्राची हिंगे यांची निवड करण्यात आली.

ही निवड प्रशासक भाऊसो ठोणे, गावकामगार तलाठी नितीन कांबळे, स्वाती शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शहापूर पोलीस ठाण्याने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेली फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.