यड्राव (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार आणि कला, क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांचे माहेरघर असलेल्या यड्राव गावातील कुमार विद्या मंदिर या प्राथमिक शाळेला उद्या (सोमवार) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या विद्या मंदिर मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून या विद्यामंदीरचे नाव लौकिक करत आहेत.

या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे राजकीय, सामाजिक, कलात्मक क्षेत्रामध्ये गावाचे आणि शाळेचे नाव उज्वल करीत आहेत. आजही सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न याच कुमार विद्या मंदीर येथे पूर्ण होताना दिसत आहे. या शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने यापुढची पिढीही  चांगली घडावी यासाठी म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून शाळेचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार केला आहे.