मनसेच्या शिरोळ तालुकाध्यक्ष पदी कुमार पुदाले…

0
131

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : मनसेच्या शिरोळ तालुकाध्यक्ष पदी कुमार पुदाले यांची निवड करण्यात आली. यावेळी जयसिंगपूरसह परिसरातल्या गावातील विविध पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. पुदाले यांच्या निवडीचे पत्र कोल्हापूर जिल्हा संपर्कध्यक्ष जयराज लांडगे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजाननराव जाधव आणि वाहतूक जिल्हा संघटक संजय भंडारे यांच्या हस्ते सत्कार करून देण्यात आले.

यावेळी पुदाले म्हणाले की, राजसाहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि शिरोळ तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. यानंतर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजाननराव जाधव यांनी, पुढील वाटचालीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्या दिल्या,

यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, जयसिंगपूर शहराध्यक्ष निलेश भिसे, उपाध्यक्ष अमित पाटील, कुबेर मगदूम, सुशांत पाटील, रोहित जाधव, अमित पुदाले, सागर माळी आदी उपस्थित होते.