पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णात पाटील…

0
58

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णात पाटील, तर उपाध्यक्षपदी प्रकाश सकटे यांची निवड करण्यात आली. तसेच सचीवपदी सुरेश वडर यांची निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे उपाध्यक्ष युवराज यादव, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी पाटील हे होते.

यावेळी योगिता पाटील, बंडा गुरव, दिपक दळवी, पंढरीनाथ सुर्यवंशी, संभाजी कुंभार, प्रकाश कांबळे, दिलीप खाडे, विनोद कुंभार, बापू पवार, भगवान बोळावे, कमल पाटील उपस्थित होते.