कृणाल पंड्याने दुबईहून ‘या’ वस्तू आणल्या : विमानतळावर ठोठावला दंड

0
58

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर दुबईहून आलेल्या  मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यू इंटेलीजेंस (डीआरआय) ने त्याच्यावर अधिक प्रमाणात  सोने आणि इतर मौल्यवान वस्तू सोबत आणल्याचा आरोप करत त्याला दंड ठोठावला.  

दरम्यान, मर्यादीत क्षमतेपेक्षा जास्त सोने बाळगल्याची आपली चूक पांड्याने मान्य केली. आपल्याला नियमांबद्दल माहिती नव्हती, असे सांगत त्याने माफी मागत दंड भरला. कृणाल पांड्याकडे मिळालेल्या सामानात सोन्याच्या दोन बांगड्या आणि महागडी घड्याळ आढळून आली आहेत.  विदेशातून सोने खरेदी केल्यानंतर  पावती जवळ ठेवणे आवश्यक असते. ती पावती कस्टम आणि एजन्सींकडून झालेल्या चौकशीवेळी तपासली जाते. त्यामुळे सोन्याची किंमत कळण्यास अधिकाऱ्यांना मदत होते.