कोरगांवकर सॅडसतर्फे सीपीआरला मदतीचा हात…

0
20

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरगांवकर सॅडसकडून सीपीआर रुग्णालयाला मदतीचा हात दिला आहे. सीपीआरला कोरगांवकर सॅडसकडून १ लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य देण्यात आले. वैद्यकीय साहित्यामध्ये ईसीजी उपकरणांसह फायबरॉप्टिक लॅरिन्गोस्कोप, बीपी उपकरणांचा याचा समावेश आहे.

शामसुंदर कोरगांवकर म्हणाले की, सर्वसामन्य रुग्णांना आणि सीपीआरसाठी सर्वतोपरी सहकार्य करू. गेली पंधरा वर्षे आम्ही विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहोत. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा उपलब्ध  करून देण्याचा आमचा मानस असतो. हे साहित्य राजर्षि शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याकडे सुपूर्द केल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, डॉ. विजय बर्गे कार्यकारी अभियंता संजय पाटील, धर्मेंद्र सरवणकर, मनोज पाटील, सतिश पाटील, अमित शेवडे, ॲड. देशमूख आदी उपस्थित होते.