कोलोलीची देव दीपावलीची यात्रा रद्द…

0
132

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे सालाबादप्रमाणे मोठ्या दिवाळीनंतर एक महिन्यांनी गावची देव दीपावली यात्रा १५ आणि १६ डिसेंबर रोजी घेतली जाते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेसंबंधी गावकरी, तंटामुक्त अध्यक्ष, देवस्थान समिती, पोलीस पाटील आणि ग्रा.पं.ची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाच्या आदेशानुसार सर्वानुमते यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गाडाई देवीचे सर्व विधी निवडक पुजारी आणि मानकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. तर यांच्या करमुणकीचे कार्यक्रम तसेच कुस्त्यांच्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत.

या बैठकला सरपंच विश्वास चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष तानाजी ढवळे, देवस्थान अध्यक्ष आर. बी. पाटील, पोलीस पाटील, सौ. शुभांगी जाधव, ग्रामसेवक संभाजी कराळे, तलाठी के. डी. पाटील, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.