कोल्हापूरच्या स्वातीची भारतीय कुस्ती संघात निवड 

0
19

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड येथील स्वाती संजय शिंदे हिची सीनियर आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. स्वाती सीनियर आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणारी महाराष्ट्रातील पहिली महिला ठरली आहे.

स्वातीने राजस्थानच्या शिवानीला कलाजंगवर ८-४ अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तर उपांत्य फेरीत मध्य प्रदेशची आंतराष्ट्रीय पदक विजेती कुस्तीगीर पूजा जाट हिचा एकेरी पट काढून ६-२ अशा गुणांनी पराभव केला. अंतिम फेरीत पूजा गेहलावत विरुद्ध स्वातीने आक्रमण खेळ करत एकेरी पट काढला व तब्बल ९ गुणांची मिळवून पूजाला चितपट केले. यामुळे तिचे भारतीय कुस्ती संघात स्थान पक्के झाले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वाती शिंदेला प्रशिक्षक दादा लवटे, डॉ. नांगरे पाटील व शिवाजी विद्यापीठाचे टीम मॅनेजर डॉ. कदम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.