कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यामुळे या संधी युवकांनी साधाव्यात असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
जाहिरातील पदे जिल्हा परिषद कोल्हापूरच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांतील असून अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 5 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत असल्याचे जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) मनीषा देसाई यांनी कळविले आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या लिंकवर दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत Online पध्दतीने अर्ज करावा. रिक्त पदांचा तपशील, पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क,ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत
अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती जिल्हा परिषदच्या https://www.zpkolhapur.gov.in आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. यास https://kolhapur.gov.inत आला असून कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु असेल, मदत कक्ष क्रमांक 0231-2655416 असा आहे.