कोल्हापूर जिल्हा परिषदेला ‘पं. दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण’ अंतर्गत देशपातळीवरील प्रथम पुरस्कार प्रदान

0 381

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पं. दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा प्रथम पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या नामांकनास केंद्र शासनाकडील पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, यांच्यामार्फत जाहीर झाला होता. दिल्लीतील सुब्रमण्यम हॉल, नॅशनल अॅग्रीकल्चरल सायन्स कॉम्प्लेक्स येथे या पुरस्काराचे वितरण आज (बुधवार)  दुपारी करण्यात आले.  केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर (पंचायती राज मंत्रालय) यांचे हस्ते जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री रविकांत आडसुळ यांनी प्रथम पारितोषिक पुरस्कार स्वीकारला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेस प्रथम पारितोषिकाचे प्रमाणपत्र व रक्कम रुपये ३० लाख बक्षीस स्वरुपात मिळाले आहे.  जि. प. अध्यक्ष मा. सौ. शौमिका महाडिक आजारी कारणास्तव दिल्ली येथे कार्यक्रमास जाऊ शकल्या नाहीत.   शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा परिषदेने विविध योजना चांगल्या प्रकारे राबविलेल्या आहेत. जि. प. च्या नाविन्यपुर्ण व्  वैशिष्टपूर्ण उपक्रमांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करणे, स्वच्छ भारत मिशन, डिजिटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार,‍ ‍शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशाला, रेकॉर्ड  वर्गीकरण अंतर्गत  डिजीटल रेकॉर्ड रुम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस,  आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने या योजना चांगल्या प्रकारे राबविलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या  प्रस्तावाचे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने करणेत आलेले होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अंबरिषसिंह घाटगे  (सभापती – अर्थ व शिक्षण समिती), सर्जेराव पाटील-पेरीडकर (सभापती – आरोग्य व बांधकाम समिती), विशांत महापुरे (सभापती – समाजकल्याण समिती), सौ. वंदना मगदूम (सभापती – महिला व बालकल्याण समिती), गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे व सर्व जि. प. सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास, प्रकल्प संचालक अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) रविकांत आडसूळ, सर्व  खातेप्रमुख, व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.

या कार्यक्रमासाठी कर्नाटक, आसाम, छत्तीसगड या राज्यांचे ग्राम विकासमंत्री उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More