मुंबई (प्रतिनिधी) : बीओटी तत्त्वावर करण्यात येणारा कोल्हापूर (शिरोली) ते सागंली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी. शासनाची मान्यता घेऊन संबंधीत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी धोरण ठरविण्यात यावे, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. ते मुंबईत बैठकी दरम्यान बोलत होते.

यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी, शासनाच्या निर्णयानुसार संबंधित रस्त्याची लांबी राष्ट्रीय महामार्ग झाल्याने हे काम केंद्र शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. या हस्तांतरीत लांबीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग काँक्रीटीकरणाचे आणि सुधारण्याची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे भरणे यांनी सांगितले.

या बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे एस. साळुंखे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प व्यवस्थापक पंदरकर, अधिक्षक अभियंता एस. माने, एम. के. वाठोरे, प्रज्ञा वाळके, अधिकारी उपस्थित होते.