कोल्हापूर मनपा निवडणूक : भाजपकडून धनंजय महाडिक, महेश जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी

0
395

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आज (गुरुवार) याबाबतचे पत्र धनंजय महाडिक व महेश जाधव यांना देण्यात आले आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या निवडणूक संचालन समितीची घोषणा पुढील दोन दिवसात करण्याची सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या निवडणुकीसाठी भाजप, ताराराणी आघाडी आणि जनसुराज्य पक्ष यांची आघाडी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाडिक आणि जाधव यांच्यावर उमेदवारी निवडीची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.