कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (सोमवार) कावळा नाका येथील छ. ताराराणी यांच्या पुतळयास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळ, संजय भोसले यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.