कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका आणि नगरपरिषदामध्ये निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धत अवलंबण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज (बुधवार) बैठकीत घेण्यात आला. यामध्ये मुंबई वगळता महाराष्ट्रामध्ये महापालिका आणि नगरपरिषदामध्ये निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धत अवलंबली जाणार आहे. फक्त मुंबईमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात अनेक निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे लोकांच्यात याबाबत द्विधा मनस्थिती दिसून येत होती. या निवडणूकीमध्ये एकसदस्यीय की तीन सदस्यीय प्रभाग रचना होणार याबाबत स्पष्टता होत नव्हती. पण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी महापालिका आणि नगरपरिषदामध्ये निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धत अवलंबण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.