‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत आरोग्य तपासणी सुरू

चंदगड (प्रतिनिधी): उमगाव येथे ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’, आरोग्य सेवा आपल्या दारी’ या आरोग्य तपासणी अभियानास सुुरुवात करण्यात आली.या अभियान राबविताना आरोग्य उपकेंद्र उमगांव अंतर्गत आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, पथकटीम, शिक्षक यांनी उत्तमरित्या जबाबदारी घेत प्रत्येक घरी जावून तपासणी करत कोरोना बचावविषयक आणी अभियानाअंतर्गत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमप्रसंगी पथकप्रमुख टीम, आरोग्यसेविका विद्या सावंत, आरोग्यसेवक डी. एम.बेले, सरपंच गणपती सुतार, गीता गावडे, संजीवनी गावडे, शिक्षक विनोद कोरवी, राजाराम नाईक, प्रल्हाद गायकवाड तसेंच स्वयंम जनसेवाचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आरोग्य तपासणी पथके करून या पथकाद्वारे गावातील प्रत्येक सदस्याचे ऑक्सिजन लेव्हल, तापमान पल्सरेट, सर्दी, ताप, खोकला यांची तपासणी होणार असून तशी नोंद करून आरोग्य खात्याकडे अहवाल देण्यात येणार आहे.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना चंदगड-जांबरे या भागातील सर्व आरोग्यसेविकांनी प्रत्येक गावा-गावात जावून तपासणी, डोस आणी लोकांना आरोग्यविषयक माहिती दिली. यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्रक देण्यात आले होते. गिता गावडे, प्रतिक्षा गावडे, शांता देवरमणी, योगिता भिसे, जयश्री किरमटे, संजना निवंगुरे या सर्व आशांंनी भागात उत्तमरित्या कार्य केले आहे. यादरम्यान या सर्वांना आरोग्यसेविका विद्या सावंत, आरोग्यसेवक डी. एम.बेले यांचे मार्गदर्शन लाभले.

Live Marathi News

Recent Posts

आत्महत्येआधी शीतल आमटेंनी केलेल्या ट्विटचा काय असेल अर्थ..?

नागपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक स्व.…

13 mins ago

‘बिग बॉस’ फेम बेळगावकर अभिनेत्री विवाहबंधनात

बेळगाव (प्रतिनिधी) : बिग बॉस फेम…

1 hour ago

आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील यांची निवड

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे…

1 hour ago

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय…

3 hours ago