कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ८०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ४ आणि इतर जिल्ह्यातील २ असे सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी चौदावी गल्ली येथील १, शुक्रवार पेठ येथील १ आणि आजरा तालुक्यातील मासेवाडी येथील १ अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,९५०.

डिस्चार्ज – ४८,१४३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ८२.

मृत्यू – १७२५.