कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६०८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६.१५ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १२, भुदरगड तालुक्यातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील ७, गगनबावडा तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, शाहूवाडी तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा ३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कागल तालुक्यातील १ आणि सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या  ४८, ४०८ झाली असून ४६,०१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण १६५४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ७४० जणांवर उपचार सुरु आहेत.