कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णांची संख्या आता चाळीसहून कमी

0
99

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दिवसभरात १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत १० जणांना लागण झाली असून ३०० जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर ६, गडहिंग्लज तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आजअखेर एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९, ६२४, डिस्चार्ज – ४७, ८८०, उपचारासाठी दाखल रुग्ण – ३४. मृतांची संख्या – १७१०.