कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णसंख्येची वाटचाल आठशेकडे

0
263

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ८० जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १५६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर शहरातील २५, भुदरगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ८,गगनबावडा तालुक्यातील १,हातकणंगले तालुक्यातील ९, कागल तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील ८, पन्हाळा तालुक्यातील ३, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील १४ अशा एकूण ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती – :
एकूण रुग्ण – ५२, ०६०, डिस्चार्ज – ४९, ५१५, उपचारासाठी दाखल रुग्ण – ७७३, मृत्यू – १७७२.